Thursday, 5 March 2015

प्रेम

प्रेम हे एक कॄष्णविवर आहे
त्याला नाही आदि नाही अंत
समीप येणार्‍याला खेचून घेते
चांगल्यालाही
वाईटालाही
अन एक दिवस साठविलेले सर्व उधळून टाकते
एका निमिषात
सॄजनासाठी
नवीन विश्व निर्मिण्यासाठी
                                                                      रश्मि

Monday, 2 March 2015

प्रेम

प्रेम आहे अनमोल
जो करतो त्याची किंमत
त्याची ओंजळ भरून वाही
जो ठरवतो त्याची किंमत 
त्याची ओंजळ रिती राही
त्याच्या ओंजळी काही नाही
रश्मि


प्रेम असते पण नाही दिसत
त्या नियंत्याप्रमाणे चराचरात असत
ते मिळते भाग्यवंतानाच
करता येते अतिभाग्यवंताना

अन्‍ जाणवत सर्वत्र त्या संतांना
रश्मि